Monday, 29 October 2018

सहकार पुरस्कारांचे 31 ऑक्टोबरला वितरण

मुंबई, दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या सहकारी संस्थांना सहकार पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सहकार पुरस्कारांचे वितरण बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात बुधवार दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
 या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, शिक्षण मंत्री विनोद तावडे, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
००००

No comments:

Post a Comment