Wednesday 31 October 2018

मशरुम शेतीतून नमिता इखार यांनी साधली आर्थिक प्रगती


विशेष वृत्त
* पौष्टिक व स्वादिष्ट मशरुम उत्पादने
                      * मशरुम शेती प्रशिक्षणातून अनेकांना मार्गदर्शन
       दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित महालक्ष्मी सरस या राज्यस्तरीय महिला बचत गटांच्या प्रदर्शनात अनेक जिद्दी  व  कष्टकरी महिलांची भेट झाली. स्वत:च्या हिमतीवर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महिलांना सरसने उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. प्रदर्शन कालावधीत साधारणत: 1 लक्ष विक्री झाल्याचे मशरुमचे विविध उत्पादने बनविणाऱ्या नमिताताईंनी सांगितले.
      स्त्रीला लक्ष्मीचे रुप समजल्या जाते. कोणत्याही कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग त्या घरातील स्त्रीच्या आर्थिक नियोजनाच्या काटकसरीला जाते. अशाच मशरुम शेतीतून स्वत:च्या कुटुंबाचा आर्थिक विकास करणाऱ्या नमिता नारायण इखार.
          भंडारा जिल्ह्याहतील पवनी तालुक्यातील ब्राम्ही  गावातील नमिता इखार यांच्या कुटुंबात दोन मुलं व एक मुलगी. पती शासकीय सेवेत दोनही मुलं मास्टर इन सायन्स (एमएससी) झालेली. पूर्णवेळ गृहणी असलेल्या नमितानी कृषी विभागामार्फत जाम, जेली व लोणचे बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. पुढे उद्योजकतेची कास धरुन मशरुम मुलाच्या मदतीने मशरुम(अळींबी) शेतीची  तळघरात लागवड केली. मशरुमपासून लोणचे, सूप, पापड, फेसपॅक तयार केले. मशरुम लागवडीसाठी दमट व अंधारे वातावरण पाहिजे. मशरुमचे (अळींबी) उत्पादन हरभरा, तूर, कुटार किंवा धानाचा कोंडा हे निर्जंतूक करण्यासाठी साधारण ते 16 तास बॅरलमध्ये बंद ठेवले जाते. त्यानंतर त्यातून पाणी काढले जाते. व  एक किलो मशरुम सीड टाकले जाते ते 100 ते 150 प्रति किलो दराने मिळते. 16 x 20 इंच आकाराच्या प्लास्टिक बॅगेत कुटार भरले जाते. या आकाराच्या कमीत कमी  दहा तर जास्ती जास्त 15 बॅगासाठी एक किलो सीड वापरल्या जाते. मशरुमचे पीक येण्याचा कालावधी हा 45 दिवसांचा असतो. मशरुमसोबतच त्यांनी त्यांच्या घरासमोरील जागेवर कारली, चवळी आंबाडी, मका, दुधी, भोपळा, दोडका या पिकांची लागवड केली आहे.
          नमिता इखार यांनी जाम उत्पादनाचा पौष्टिकपणा वाढविण्यासाठी अंबाडीच्या जामचादेखील त्यात उपयोग केला. महिन्याला साधारणत: 40 ते 50 हजाराचे उत्पन्न मशरुम पावडर ते मशरुमचे जाम, लोणचे, मशरुम पापड, मशरुम मिल्क पावडर, मशरुम कुकीज, मशरुम बिस्किट यासारख्या उत्पादनातून मिळतो. पायलट मशरुम फार्म या नावाने पवनी-भंडारा रोडवर त्यांचे फार्म आहे.
मशरुमचे आरोग्य विषयक फायदे
प्रोटीनचे सर्वाधिक प्रमाण, वजन संतुलित करतो, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण करतो, हाडांचे आरोग्य सुधारतो, कॅन्सरपासून प्रतिबंध, व्हीटॅमीन बी, बी-12 याचा उत्तम स्त्रोत यामध्ये आहे. मशरुमची भाजी आरोग्यासाठी चांगली असते.

      



            मशरुमपासून पारंपरिक उत्पादनापेक्षा लवकरच मशरुमची कोल्ड कॉफी सुद्धा तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. नमितासोबत त्यांची मुलं अनंत व श्रीकांत मुलगी  शुभांगी त्यांना व्यवसायात मदत करते. मशरुमचे वितरक म्हणून त्या काम करतात. मशरुम शेती प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून इतर बेरोजगार तरुण तरुणींना व्यवसायासाठी ते प्रेरणा देतात. त्यांच्या उच्च शिक्षित मुलांनी उत्पादन विक्रीसाठी यू-ट्यूब चॅनल व फेसबुकच्या माध्यमातून मदत केली आहे. खरोखर महिन्याला 40 ते 50 हजार उत्पन्न देणाऱ्या मशरुममधून नमिताताईंनी स्वत:च्या कुटुंबाला आधार दिला आहे.

                                                                                      शैलजा वाघ- दांदळे
       8381001097
  ****

No comments:

Post a Comment