मुंबई, दि. 28 : पाटील इस्टेट, संगमवाडी, शिवाजी नगर, पुणे या झोपडपट्टी क्षेत्रात सिलेंडरच्या स्फोटाने लागलेल्या आगीमुळे काही झोपड्यांचे नुकसान झाले असून झोपडपट्टीस लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे व पुणे महापालिका, जिल्हाधिकारी व पुणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या समन्वयाने पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
सदर झोपडपट्टी 21 हजार चौ.मी. क्षेत्रात असून या क्षेत्रात 1 हजार 176 झोपड्या आहेत. आगीच्या दुर्घटनेत सद्यस्थितीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. दुपारी 4 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली. 1987 मध्ये हे क्षेत्र झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. घोषित झोपडपट्टी क्षेत्र अंदाजे 17 हजार चौ.मी. आहे, असेही यावेळी श्री. वायकर यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment