मुंबई, दि. 28 : माहिती
व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात खासदार अमर साबळे
यांची ‘भारताचे संविधान' या
विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व
केंद्रांवरून गुरूवार दि. 29 आणि
शुक्रवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या
वेळेत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले आहे.
शासनातर्फे राज्यात 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 या
कालावधीत संविधान सप्ताह साजरा केला जात आहे. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून
भारताची असलेली ओळख, संविधान सप्ताहाचे
महत्व, घटनेने दिलेल्या
अधिकारांबद्दल प्रत्येकाने कशा प्रकारे जागरूक आणि संवेदनशील असले पाहिजे, राज्यघटनेतील तत्वांची सर्वांना माहिती होण्यासाठी कोणते
प्रयत्न व्हायला पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती खासदार अमर साबळे यांनी दिलखुलास
कार्यक्रमातून दिली आहे.
*****

No comments:
Post a Comment