Saturday 29 December 2018

रामटेक येथील बेरोजगार मेळाव्यातून 769 युवकांना मिळणार रोजगार










बेरोजगार युवकांना काम उपलब्ध करुन देणे काळाची गरज
– खासदार कृपाल तुमाने
नागपूर,दि.29: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय नागपूर व शासकीय औद्योगिक संस्था रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामटेक येथील युवक-युवती पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 769 तरुणांना रोजगार मिळणार असून, या रोजगार मेळाव्यात 20 विविध कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच 2817 युवक-युवतींनी रोजगार मेळाव्यात नोंदणी केली.
            यावेळी व्यासपीठावर खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष ॲड आशिष जयस्वाल, खैरी बीजेवाडाच्या सरपंच श्रीमती ऊर्मिला खुडसाव, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रवीण खंडारे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री. बनसोड  उपस्थित होते.
जगात भारत हा तरुणांचा देश म्हणून परिचित आहे. देशातील युवा मनुष्यबळ हे देशाची खरी ताकद असून, त्यांच्या हाताला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील स्कील इंडियाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना काम मिळत आहे. त्यांच्या हाताला काम उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी  केले.
            खासदार कृपाल तुमाने म्हणाले की, भारतात सर्वाधिक तरुण आहेत. ते देशाच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या हाताला काम मिळवून देणे ही सर्वाची जबाबदारी आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेरोजगार युवक – युवतींसाठी आज रोजगार मेळाळा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्यात बेरोजगार युवकांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
याठिकाणी मिळालेल्या कामात कोणताही कमीपणा न मानता चिकाटीने काम करावे.  सुरुवात ही छोट्या कामापासूनच करावी लागते. कामाच्या अनुभवातूनच मोठ-मोठ्या पदापर्यंत जाता येणार असल्याचे युवकांनी  लक्षात घेतले पाहिजे. युवावर्गच देशाला विकसित देशाकडे नेऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इथे विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आले असून, त्यांनी स्थानिकांना प्राधान्य द्यावे. त्यासाठी युवकांनी जिद्दीने कामे केली तरच भविष्य उज्ज्वल राहील. तुमच्यातील कौशल्य आणि काम करण्याची चिकाटी, कामातील सातत्य याच्या बळावरच कंपनीचे प्रतिनिधी तुम्हाला पात्र ठरवितात. जे या रोजगार मेळाव्यात पात्र ठरतील त्यांना शुभेच्छा देऊन अपात्र युवकांनी निराश न होता नागपुरात होणा-या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यास सांगितले.
           यावेळी खनिकर्म मंडळाचे अध्यक्ष ॲङ आशिष जयस्वाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतात तरुणांची संख्या मोठी असून, युवावर्गातच देशाला विकसित राष्ट्र बनविण्याची ताकद आहे. त्यामुळे युवकांनी निराश न होता, या विकास प्रक्रियेचा भाग बनले पाहिजे. सध्या देशातील  वाढती लोकसंख्या, रोजगार निर्मितीचा दर  आणि वाढती बेरोजगारांची संख्या यांच्यात प्रचंड तफावत आहे. हे जरी खरे असले तरी गेल्या चार वर्षात प्रधानमंत्री यांच्या स्कील इंडियाकार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकसीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.  
           कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक प्रवीण खंडारे यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात आतापर्यंत 15 बेरोजगार युवक-युवती मेळावे घेतले असून, हा 16 मेळावा रामटेक येथे घेत आहोत. कुशल महाराष्ट्र, रोजगार महाराष्ट्र यानुसार नागपूर जिल्हा रोजगार मेळावे घेऊन युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आघाडीवर आहे. युवकांनी केवळ पदवी शिक्षण घेऊन उपयोग नाही तर त्यासोबत तीन - चार महिन्यांचे कौशल्यावर आधारीत कोर्स उपलब्ध करुन देण्यात येत आहेत,  त्याचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.  तसेच जास्तीत जास्त संधी व रोजगार देणार असल्याचे सांगत येत्या जानेवारीत नागपुरात महामेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.  
 या एकदिवसीय मेळाव्यात मेसर्स सूर्यालक्ष्मी कॉटन मिल्स लि.जॉबकट्टामहिंद्रा एण्ड महिंद्राअल्ट्राटेक सिमेंटदि युनिवर्सल ग्रुप असोशिएशन अशा विविध भागातील 20 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या मेळाव्यात इयत्ता 10वीं, 12वींपदवीधरअभियांत्रिकीडिप्लोमाबी. फार्मटेक्नीकलनॉन-टेक्नीकल,आयटीआयबी. ई.बी.टेक फूड टेक्नॉलॉजीबीएस्सीएम.एस्सीमाईक्रोबॉयलॉजी ही शैक्षणिक पात्रता असणारे बेरोजगार युवक-युवतींन रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदविला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कोटांगले यांनी तर आभार प्राचार्य आर. एच. बनसोड यांनी मानले.
****** 

No comments:

Post a Comment