Wednesday, 26 December 2018

‘दिलखुलास’मध्ये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. भिडे


मुंबई, दि. २६ :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. एम.बी. भिडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. २७ आणि शुक्रवार दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत  घेतली  आहे.
            मुंबईतील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश, संस्थेत दाखल होण्यासाठीची प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मार्गदर्शन व शिष्यवृत्ती,  केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होणा-या राज्यातील विद्यार्थ्यांच्या यशात या संस्थेचे योगदान, युपीएससी परीक्षेची तयारी कशाप्रकारे व केव्हा सुरू करावी तसेच मराठी माध्यमातून युपीएससी परीक्षा देण्याबाबतची सविस्तर माहिती डॉ. भिडे यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.
0000

No comments:

Post a Comment