Friday, 4 January 2019

सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानकलगत संरक्षण भिंतीच्या कामांचे कामाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


मुंबई, दि. 4 : सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक व मेहेरबक्ष कंपाऊंड इमारतीमधील रेल्वेलगत संरक्षण भिंतीच्या कामाचे शुभारंभ मुंबईचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडले.
यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्विकास मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, मिनाताई कांबळी, पांडुरंग सकपाळ, जयश्री बार्लिकर आदी उपस्थित होते.
सॅण्डहर्स्ट रोड रेल्वे स्थानक व मेहेरबक्ष कंपाऊंड इमारत परिसरातील भिंत कोसळली होती. त्यामुळे येथे भिंत उभारण्यासाठी शासनाने पाऊलं उचलली आहेत. या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निधी मंजूर केला. काम जोखमीचे होते. आयआयटी संस्थेने पाहणी केल्यानंतर कामाची निविदा काढण्यात आली. सध्या काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असली तरी पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले. सरंक्षण भिंतीच्या कामामुळे येथे नागरिकांना घरे खाली करावी लागणार नसल्याचेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.
००००

No comments:

Post a Comment