Friday 29 March 2019

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी 12 सदिच्छादुतांचे आवाहन















निवडणूक विशेष वृत्त -


मुंबई, दि. 29 :  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावामतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार जागृतीच्या या उपक्रमांना आता कलाक्रीडासाहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध 12 मान्यवरांची सदिच्छादूत’ म्हणून साथ लाभली आहे. समाज माध्यमेमुद्रितमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच जाहिरात फलक, भित्तीपत्रकादवारे हे सदिच्छादूत  लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.

या सदिच्छादूतांमध्ये पद्मभूषण आणि महाराष्ट्रभूषण सन्मानित अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, अर्जुन पुरस्कार सन्मानित महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते पद्माकर कांबळे, खेळाडू राही सरनोबत, वीरधवल खाडे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ.तात्याराव लहाने, डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सनदी अधिकारी ए.एम. खान यांनी सदिच्छादूतम्हणून काम करुन मतदान जागृतीचे आवाहन केले होते. 
००००

No comments:

Post a Comment