Saturday 30 March 2019

केवळ एक रुपयात पाळीव प्राण्यांसाठी तोंडखुरी व पायखुरी प्रतिबंधात्मक लसीकरण 21 मेपर्यंत


नागपूर दि. 30, राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात तोंडखुरी व पायखुरी आजार झालेल्या पाळीव प्राण्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 21 मेपर्यंत जिल्ह्यात केवळ एक रुपयात प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे.
 लसीकरण मोहिमेची ही 14 वी फेरी असून, वर्षातून दोन वेळा पाळीव प्राण्यांचे लसीकरण केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांना लसीचा पुरवठा करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी नजिकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात वरील लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
                                ******

No comments:

Post a Comment