मुंबई, दि. 25 :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’
कार्यक्रमात ‘कला क्षेत्रातील संधी’ या विषयावर जे.जे. स्कूल ऑफ
अप्लाईड आर्टसचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. गजानन सीताराम शेपाळ यांची विशेष
मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार
दिनांक 26 मार्च 2019 रोजी रात्री 9:00 वाजता प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा
मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
चौथी ते दहावी पर्यंतच्या मुलांचा कला
शाखेकडे कल आहे का हे कसे ओळखावे, कला शाखेकडे जायचे असल्यास त्याकरिता असणाऱ्या परीक्षा,
दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना या शाखेत
कशा प्रकारे प्रवेश घेता येतो, कला क्षेत्रातील अभ्यासक्रम व
संधी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, व्यवसायाच्या
दृष्टिकोनातून सुरू असलेले अभ्यासक्रम, कॅलिग्राफी
क्षेत्रातील संधी, राज्य कला संचालनालयांतर्गत येत असलेले
विविध अभ्यासक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती श्री. शेपाळ यांनी ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment