मुंबई, दि. 15 :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'पर्यावरणपूरक होळी' या विषयावर पर्यावरण तज्ज्ञ प्रा.
विद्याधर वालावलकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील
आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून शनिवार दि.16, सोमवार दि.18
आणि मंगळवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 7.25
ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पर्यावरणपूरक होळी
कशी साजरी केली पाहिजे,
होळी, धुळवड आणि रंगपंचमी यातील फरक, पर्यावरणपूरक रंग कसे ओळखावे, रासायनिक रंगांमुळे
होणारे दुषपरिणाम,होळी, रंगपंचमी
खेळतांना लहान मुलांनी घ्यावयाची काळजी, नैसर्गिक रंग बनविण्याची
पध्दत, पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याकडे लोकांचा असलेला कल
आदी विषयी सविस्तर माहिती श्री. वालावलकर यांनी ‘दिलखुलास’
या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:
Post a Comment