मुंबई, दि. 15 : ‘आपलं मंत्रालय’ मार्चच्या अंकाचे प्रकाशन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा
गाडगीळ यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले. श्रीमती गाडगीळ या अंकाच्या
अतिथी संपादक आहेत. यावेळी वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर, मनीषा पिंगळे, सहाय्यक संचालक मंगेश वरकड उपस्थित
होते.
या अंकात मंत्रालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागातील अवर सचिव सुहास चव्हाण
यांचे अपघाती निधन झाले, त्यांच्या बद्दल मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी
व्यक्त केलेल्या भावना आणि श्रद्धांजली, सेवानिवृत्ती,
व्यंगचित्रे, चुटकुले, अनुभव,
कविता, मंत्रालय परिसरातील घडामोडींचा यात
समावेश करण्यात आला आहे. हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे.
00000


No comments:
Post a Comment