Wednesday, 6 March 2019

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये शुक्रवारपासून महिला महोत्सव



मुंबई, दि. ६ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये महिला महोत्सव हा ८ ते ११ मार्च या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, यांच्या हस्ते ८ मार्च रोजी सायं ७ वा. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये होणार आहे. महिला महोत्सवामध्ये या वर्षी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये उदघाटनाच्या दिवशी म्हणजेच ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता हे बंध रेशमाचे एक अनोखा वाद्य संगीत आविष्कार कार्यक्रम व सायंकाळी ७.३० वाजता वेलकम होम हा मराठी चित्रपट रवींद्र नाट्य मंदिर येथे दाखविण्यात येणार आहे; त्याचबरोबर  सुमित्रा भावे यांची मुलाखत  श्री. मोहन आगाशे  घेणार आहेत. ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मिनी थिएटर मध्ये विद्याधर पुंडलिक यांच्या गाजलेल्या नाटकाचे माता द्रौपदी  अभिवाचनाचा कार्यक्रम मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव आणि दुपारी १२ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांना अभिवादन करण्याकरिता शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भावसंगीत, सिनेसंगीत यांचा समावेश असाणारा दृकश्राव्य कार्यक्रम डी डायमेंशन, पुणे हे सादर करणार आहेत.
अस्मिता फिल्मस् ॲण्ड एंटरटेनमेंट तर्फे ९ मार्च रोजी दु. २.३० वा दिशादर्शिनी महिला जनजागृती हा महिला व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम. चर्चासत्र व प्रश्नोत्तरी मुलाखतच्या माध्यमातून जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीता फडके, ओबिसीटी सर्जन डॉ. जयश्री तोडकर व मानसोपचार तज्ञ डॉ. प्रज्ञा अजिंक्य हे सहभागी होणार आहेत. तसेच सदर दिवशी दु. ४ ते ६ वाजेपर्यंत अभया विपश्या वास्तव ह्या एकांकिका सादर होणार आहेत. सायं ७ वाजता सावित्री विरुध्द सावित्री  हे लघु नाट्य पार्थ थिएटर्स सादर करणार आहेत. तसेच रा. ८ वा रविंद्र नाट्य मंदिर येथे मुक्ती(संगीत व नाट्याचा मिलाप) सादरकर्ते रागभक्ती व मिनी थिएटर येथे  पदार्पण (नृत्याविष्कार) सादरकर्ते अपेक्षा डान्स कला अकादमी  हा कार्यक्रम सादर करणार आहेत. १० मार्च रोजी सकाळी ११ वा व्होयाज, कथा सृष्टीची कथक बॅले हा कार्यक्रम रंजना फडके तर सर्वम् नृत्यमयम् हे नृत्य झेलम परांजपे यांच्या वतीने रविंद्र नाट्य मंदिरमध्ये दुपारी १२ वा आयोजीत करण्यात आला आहे. 
स्मितालय प्रस्तुत जनी म्हणे हा संत जनाबाईंच्या अभंगावर आधारित नृत्याचा कार्यक्रम दुपारी २.३० वा मिनी थिएटर येथे आयोजीत करण्यात आला आहे.
१० मार्च रोजी दुपारी ३ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे नॉटी फॉटी  हे दोन अंकी मराठी नाटक सादर होणार आहे. तसेच मिनी थिएटरमध्ये दुपारी ४ वाजता राधाकृष्णाच्या अमर प्रेमाने स्पर्शित झालेली एक तरल प्रेमकथा मीट मी ऑन द मेडो हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच सायं ६.३० वाजता नवनायिका नृत्याविष्कार कलाश्री, पुणे सादर करणार आहेत व रात्री ७.३० वाजता कलापथक या कार्यक्रमातून बेटी बचाव बेटी पढावहा मोलाचा संदेश देणारा भारुड कार्यक्रम कलांगण येथे सादर होणार असून त्यात चंदाताई तिवाडी, मिराताई उमप व सत्यभामा आवळे यांचा सहभाग असणार आहे.
११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता मराठी सिनेमासृष्टीतील दिग्गज तारका, त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील दिलेले योगदान, आदर्श आणि त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायला, त्याचबरोबर त्यांना मानवंदना देण्यासाठी अष्टतारका हा दृकश्राव्य कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच दुपारी २.३० वा कस्तुरी हे बालनाट्य व सायं ५.३० वाजता एल तीरावर, पैल तरावर हा रुपेरी जगातल्या सोनेरी आठवणी देणारा कार्यक्रम सादर होणार आहे. ११ मार्च रोजी रात्री ८ वाजता संगीत देवबाभळी  हे संगीत नाटक  रवींद्र नाट्य मंदिरमध्ये सादर होणार आहे, अशी माहिती पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण मारुती चवरे यांनी दिली.
००००

No comments:

Post a Comment