निवडणूक
आयोगाच्या सूचना
नागपूर,दि. 26 :
निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अथवा राजकीय पक्षांनी
जाहिरात तसेच निवडणुकीचा प्रचार करताना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा
वापर करु नये, असे समुपदेशन जारी केले आहे.
नागपूर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष व सर्व उमेदवारांनी
लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार करतांना सुरक्षा दलातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा वापर करु नये तसेच
इतरांना वापर करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment