मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'चला पर्यटनाला' या विषयावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवार दि. २ एप्रिल रोजी रात्री ९:०० वाजता या मुलाखतीचा पहिला भाग प्रसारित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ही मुलाखत मंगळवार दि. २ ते शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
देश-विदेशातील पर्यटकांची महाराष्ट्रातील आकर्षणाची केंद्र, राज्यातील खाद्यसंस्कृती, कोकण पर्यटन, वन्यजीव, गडकिल्ले, धार्मिक पर्यटन, युनेस्कोने जाहिर केलेली जागतिक वारसा स्थळे, लेणी, पर्यटनासाठी महत्वाची ठिकाणे, राज्यातील पर्यटनाला वाव आदी विषयी सविस्तर माहिती श्री. काळे यांनी ‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment