Friday, 15 November 2019

बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन


मुंबई, दि. : 15 भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त  आज मंत्रालयात मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
            यावेळी मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजेश निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या श्रीमती अंशू सिन्हा, उप सचिव ज.जी. वळवी, आदिवासी विकास विभागाचे अवर सचिव रविंद्र आवटे, कक्ष अधिकारी पांडूरंग राऊत, गजानन देशमुख यांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment