Monday, 2 December 2019

‘जय महाराष्ट्र' व 'दिलखुलास' कार्यक्रमात 'डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धती' या विषयावर वाठोरे यांची मुलाखत


मुंबईदि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ व 'दिलखुलासकार्यक्रमात  डिजिटल व्यवहारांना चालना देणारी फास्टॅग पद्धतीया विषयावर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक एम. के. वाठोरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.  डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रक्षेपित होईल. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. ४ आणि गुरुवार दि. ५ डिसेंबर 2019 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
 महाराष्ट्रात रस्ते विकासासाठी प्राधिकरणाचे सुरू असलेले प्रकल्परस्ते बांधणीमध्ये पीपीपी मॉडेलकेंद्र सरकारचे वन नेशन वन टॅग धोरणपंधरा डिसेंबरपासून  टोल फास्टॅग व्दारे स्वीकारला जाणार असूनफास्टॅग नेमके कायफास्टॅग ची कार्यपद्धतीफास्टॅग कोठे मिळेल आणि काय कागदपत्रे लागतीलफास्टॅग चे नेमके फायदेफास्टॅग रिचार्ज कसे करायचे आदी विषयांची माहिती श्री. वाठोरे यांनी जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment