नागपूर, दि. 9: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या राष्ट्रीय पोषण अभियानाचा भाग म्हणून शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात पोषण पंधरवाडा सुरु असून, त्यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोषण पंधरवाडानिमित्त येथील प्रसूतीतंत्र स्त्रीरोग विभागातील बाह्य रुग्ण विभागात अधिष्ठाता डॉ. सुभाष राऊत यांच्या हस्ते पंधरवाडा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. दिनांक 8 ते 22 मार्चदरम्यान हा पंधरवाडा साजरा होत आहे. दरम्यान गरोदर महिला, स्तनदा माता, किशोरवयीन मुली आणि लहान मुलांसाठी आरोग्य व पोषण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment