Wednesday, 18 March 2020

पेट्रोल पंप, किराणा, भाजी विक्री सुरु राहणार -जिल्हाधिकारी



नागपूर, दि. 18 : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्ह्यातील केवळ बिअर शॉपी, वाईन शॉप, परमिट रुम बार ॲन्ड रेस्टॉरंट, क्लब, देशी दारु दुकाने, सर्व रेस्टॉरंट व पान ठेले दिनांक 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. परंतू सर्व पेट्रोल पंप, किराणा दुकान आठवडी बाजार, भाजी विक्रीचे सर्व छोटी दुकाने नियमित सुरु राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा पसरविण्यात आली असून या अफवेवर कुणीही विश्वास ठेवू नये. पेट्रोल पंप नियमित सुरु राहणार आहेत. तसेच रेल्वे स्टेशन, विमानतळ, बसस्थानक यांना बंद मधून वगळण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी  स्पष्ट केले आहे.
                                                            *****

No comments:

Post a Comment