Wednesday, 17 June 2020

खरीप पेरणीसाठी बँकांनी सुलभपणे शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा -रविंद्र ठाकरे


                    * 27 हजार 636 शेतकऱ्यांना 290 कोटींचा कर्जपुरवठा
                  * कर्जपुरवठ्याची गती वाढवा, बँकांना सूचना
                  * जिल्ह्यात सरासरी 24 टक्के खरीप कर्जवाटप
                * समाधानकारक पावसामुळे 50 टक्के पेरण्या पूर्ण

        नागपूर, दि. 17शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज विविध राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांच्या प्रतिनिधींना दिल्या.
            खरीप हंगामासाठी 27 हजार 636 शेतकरी खातेदार 290 कोटी 47 लक्ष रुपयांचा कर्जपुरवठा विविध बँकांना करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण उद्दिष्टाच्या 24 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला असून बँकांनी दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर्जपुरवठा करण्यासाठी वेग वाढवावा. असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
            राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत 22 हजार 785 शेतकरी खातेदारांना 228 कोटी 8 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 25 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला असून पुढील आठवड्यात विशेष कर्ज मेळावे घेवून 50 टक्केपेक्षा जास्त कर्जपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. दिलेल्या उद्दिष्टापैकी बँक ऑफ इंडिया 17 टक्के, सिंडिकेट बँक 3 टक्के, युनियन बँक 16 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 19 टक्के, पंजाब नॅशनल बँक 22 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँक 40 टक्के, इंडियन बँक 27 टक्के, कार्पोरेशन बँक 48 टक्के, कॅनरा बँक 23 टक्के, बँक ऑफ महाराष्ट्र 44 टक्के, बँक ऑफ इंडिया 26 टक्के, बँक ऑफ बडोदा 30 टक्के, आंध्र बँक 23 टक्के तर अलाहाबाद बँकेने 23 टक्के कर्जपुरवठा केला आहे.
            खाजगी बॅकांनी 16 टक्के, कमर्शियल बँकांनी 24 टक्के तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेने 25 टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण बँक यांनी प्रत्येकी 37 टक्के कर्जवाटप केले आहे. खरीप हंगामासाठी 1 हजार 35 कोटी 30 लक्ष रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते.
            जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपच्या सरासरी 50 टक्के पेरण्या पूर्ण केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली.
******

No comments:

Post a Comment