Monday, 15 June 2020

निकालाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका


       नागपूर, दि. 15: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (पुणे) फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी ) व  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  (इयत्ता 12 वी ) परीक्षेच्या  निकालाची तारीख मंडळाने  अजूनही जाहीर केली नाहीपरंत या परीक्षांच्या निकालाच्या वेगवेगळया तारखा  व्हॉट्स ॲपफेसबुक व सोशल मीडियावर  परस्पर प्रसारित होत आहेततरी अशा अफवांवर विद्यार्थी तसेच पालकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
           फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये  घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र        (इयत्ता 10 वी ) व  उच्च माध्यमिक प्रमाणपत्र  (इयत्ता 12 वी ) परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळामार्फत मंडळाच्या अधिकृत इमेलद्वारे, प्रसिद्धी माध्यमे व वर्तमानपत्रामार्फत  व मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईलयाबाबत सर्व  संबंधित विद्यार्थी, पालक, शाळाकनिष्ठ महाविद्यालये  व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
*****

No comments:

Post a Comment