Wednesday 29 July 2020

गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करा


प्र. प. क्र. 481                                                                दिनांक: 29 जुलै 2020


नागपूर, दि. 29 :  इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर यापूर्वी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती प्राप्त करुन घेण्यासाठी विद्यार्थी यापूर्वी स्वत: मंडळाकडे जाऊन अर्ज सादर करीत होते. परंतु सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना  विभागीय मंडळामध्ये जाणे गैरसोयीचे आहे.  तसेच  या अनुषंगाने मंडळामध्ये गर्दी टाळणे आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांना यावेळी गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती ऑनलाईन अर्ज सादर करुन मिळतील.
                  ऑनलाईन प्रक्रिया उद्या दिनांक 30 जुलैपासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तपत्रिकेच्या छायांकित प्रती व पुनर्मूल्यांकन यासाठी अर्ज करण्यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी  साठी http://http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे. यासाठी भरावयाचे विहित शुल्क, अटी, शर्ती व सूचना मंडळाच्या http://http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क Debit Card, Credit Card, UPI, Net Banking याद्वारेच ऑनलाईन भरावयाचे आहे.
                  मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
*****

No comments:

Post a Comment