नागपूर, दि. 1 : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सोमवारी (3 ऑगस्ट) नागपूर
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सोमवारी सकाळी 9.30 वाजता डॉ.
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे त्यांचे आगमन होईल, त्यांनतर ते रवी
भवनकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 वाजता नागपूर विभागातील कोरोना
प्रादुर्भावसंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेणार असून,
दुपारी 12 वाजेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी 1
वाजता रविभवन येथे आगमन व राखीव. रात्री 9 वाजता विशेष विमानाने त्यांचे मुंबईकडे
प्रयाण होईल.
*****
No comments:
Post a Comment