Saturday 31 October 2020

विभागीय आयुक्त कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आदिकवी महर्षी वाल्मिकी, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

 

    




       
नागपूर, दि.31: विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज आदिकवी महर्षी वाल्मिकी तसेच लोहपुरुष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            उपआयुक्त चंद्रभान पराते यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिवस हा देशभर राष्ट्रीय एकता दिवसम्हणून साजरा करण्यात येतो.  यावेळी श्री. पराते यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ दिली. तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी दिवस हा राष्ट्रीय संकल्प दिवसम्हणून साजरा करण्यात येतो.

            तहसिलदार अरविंद सेलोकर, नायब तहसिलदार संदीप तडसे तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

                                       जिल्हाधिकारीकार्यालय
           
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन सभागृहात आज आदिकवी महर्षी वाल्मिकी तसेच लोहपुरुष माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. ठाकरे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ दिली.

            निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातळे तसेच जिल्हाधिकारी  कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

*****

 

No comments:

Post a Comment