‘मिशन ऑल आउट’ अंतर्गत कारवाईत सहा लाखाचा अवैध मद्यसाठा जप्त
नागपूर दि. 01: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने मिशन ऑल आऊट अंतर्गत शहरात कारवाई करण्यात आली. त्या कारवाईत दोन व्यक्तींकडून देशी व विदेशी मद्याच्या 368 बाटल्या, दोन भ्रमणध्वनी संच व एक चारचाही वाहन असा एकूण सहा लाख 36 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
धरमपेठ येथील करण यशवंत अडवानी व नितेश यशवंत अडवानी या दोघांकडे वरील अवैध मद्यसाठा असल्याची माहिती सूत्रांनी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंमलबजावणी व दक्षता संचालक उषा वर्मा यांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक प्रशांत गोतमारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. भरारी पथकात निरीक्षक सुहास दळवी, निरीक्षक केशव चौधरी, अशोक शितोळे, विशाल कोल्हे, मोहन पाटील, महिला जवान स्नेहा पवार, शितल सरोदे यांच्यासह इतर जवान सहभागी होते.
No comments:
Post a Comment