क्षयरोग तपासणीचे उद्दिष्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण करा- जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
·
जिल्हास्तरीय
क्षयरोग फोरमची बैठक
·
प्लाझमा दान
करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नागपूर, दि.
03:
कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर फार
मोठा ताण आल्याने क्षयरोग विषयक सर्व यंत्रणा त्यामध्ये सहभागी झाली. त्यामुळे जिल्हयातील
उदिष्ठय पूर्ण होऊ शकले नाही. क्षयरोगाचे फक्त 45 टक्के कामे पूर्ण झालीत. आता कोविडचा
प्रादुर्भाव कमी झाल्याने कोविडच्या कामात असलेले अधिकारी व कर्मचारी यांना परत बोलावून पुर्ववत कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
रविंद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या. नियोजित क्षयरोग तपासणीचे उदिष्टय डिसेंबर
मध्ये कसे पूर्ण करता येईल यावर भर दयावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय क्षयरोग फोरमची बैठक जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या
अध्यक्षते जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर
फडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे, डॉ. जिचकार, डॉ. मुळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील लोकसंख्येच्या अनुषंगाने क्षयरुग्णात
मोठया प्रमाणात वाढ होत आहे. ती कमी करा. सर्व केंद्र तात्काळ सुरु करा, घरोघरी जावून
मोहिम राबवा, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
कोविड प्रार्दुभावाबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, मला सुध्दा कोविडचा
प्रार्दुभाव झाला होता. त्यामधून मी सुखरुप बरा झाल्यानंतर प्लाझमा दान केले. प्लाझमा
दान केल्या फक्त एक दिवसात सर्व कमजोरी निघू न तंदुरुस्त होतो. त्यामुळे घाबरण्याची
गरज नाही. कोणतीही चिंता न करता कोविड मधून बरा झालेल्या व्यक्तींनी प्लाझमा दान करावे,
असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले.
यावेळी सादरीकरणाद्वारे आढावा सादर करण्यात
आला. यात पोषण् आहार, कोमारबिडीटी, अंत्यादयमध्ये क्षयरुग्णांचा समावेश, सामूदायिक
वचन बध्दता, सुलभता, याचा समावेश होता.
यावेळी क्षयरुग्ण चॅम्पीयन यांनी आपले
मनोगत व्यकत केले. रंजना देवरे यांनी वेळेवर उपचारांअंती मृत्युच्या दाढेतून परत आली,
असे सांगितले. त्या अशा वर्कर व अंगणवाडी सेविका अशा दोन्ही जबाबदाऱ्या पाळून क्षयरुग्णावर
मात केली आहे. त्यांचे यावेळी उपस्थितांद्वारे कौतुक करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment