जवाहर नवोदय विद्यालयाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
नागपूर, दि. 7 : पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी ते नववीत ऑनलाईन प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरु झालेली आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पोर्टलवर नाव नोंदणी करण्यासाठी www.navodaya.gov.in (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट नवोदया डॉट जीवोव्ही डॉट इन ) या संकेतस्थळावर नाव नोंदणी करुन विहित नमुन्यातील अर्ज भरावा. ही प्रवेश प्रक्रिया मंगळवार, 15 डिसेंबर, 2020 पर्यंत चालणार आहे. ग्रामीण भागातील होतकरु विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश देण्यासाठी पालकांसमवेत शिक्षक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच समाजसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या विद्यालयाच्या प्राचार्यानी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment