Wednesday 27 January 2021

 

कोरोना निर्मुलनासाठी केलेल्या यशस्वी कार्याबद्दल विभागीय आयुक्तांचा गौरव


        
नागपूर, दि. 27 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात राबविलेल्या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे  विभागात 95.22 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर राहिला आहे. याच काळात जनतेने आवश्यक सोयी व सुविधा उपलब्ध करुन देताना लसीकरणामध्ये सुद्धा विभागाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भारतीय प्रजासत्ता दिनाच्या मुख्य समारंभात राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त यांचा स्मृतिचिन्ह देवून विशेष गौरव केला आहे.

            नागपूर विभागात कोरोना प्रादुर्भावाचे 2 लाख 3 हजार 112 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 1 लाख 93 हजार 403 रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. विभागातील विविध रुग्णालयात 1 हजार 176 रुग्णांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

            कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रुगणालयात ऑक्सिजनसह विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे विदर्भातील रुग्णांसाठी कोविड रुग्णालयात सुविधा उपलब्ध होवू शकल्या त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य झाले. नागपूर विभागाचा बरे होण्याचा दर राज्यापेक्षा जास्त आहे. तसेच विभागात 15 लाख 29 हजार 363 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यासाठी नागपूर शहर सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. विमानतळावर देशातून व विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी करण्याची सुविधा प्रथमत: नागपूर येथे सुरु झाली. त्यामुळे कोविडवर प्रभावी व परिणामकारक उपचार शक्य झाले. डॉ. संजीव कुमार यांनी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष टास्क फोर्स तयार करुन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी विशेष सुविधा निर्माण केली. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment