Friday 29 January 2021

जिल्हास्तरीय ऑनलाईन वेबिनारला शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद नागपूर,दि. 29 :- जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी पाच दिवसीय ऑनलाईन वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले होते. वेबिनारला जिल्ह्यातील शिक्षक व इतर सर्व घटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पारित केले. या धोरणाची माहिती सर्वांना मिळावी , शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच शिक्षकांना याबाबत सजगता निर्माण व्हावी व काळाच्या गरजेच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टीने पावले उचलावीत या हेतुने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. निश्चित कालावधीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020
बाबत प्रारंभिक बाल्यअवस्थेतील काळजी व शिक्षण, महिती संप्रेषण तंत्रज्ञान, शिक्षकांची बदलती भूमिका, भाषा शिक्षण, शिक्षक-शिक्षण या विषयावर विस्तृत माहिती देण्यात आली. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ व अनुभवी एनसीईआरटी नवी दिल्लीच्या प्राध्यापक उषा शर्मा, दिल्ली विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. पवन सिन्हा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता तथा समन्वयक व मार्गदर्शक डॉ. नितू गावंडे आदींचे मार्गदर्शन वेबिनारच्या माध्यमातून मिळाले. नवीन राष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात शिक्षकांच्या मनातील प्रश्न व शंकांचे समाधान यावेळी करण्यात आले. वेबिनारचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य हर्षलता बुराडे यांनी केले तर तांत्रिक सहाय्य जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केले. मार्गदर्शन व सहकार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक रविंद्र रमतकर व अध्यापक विद्यालयातील प्राचार्य, अध्यापकाचार्य यांचा सहभाग तसेच शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांचे सहकार्य लाभले. दररोज वेबीनारला वेबेएक्स व यू-ट्यूबच्या माध्यमातून उत्कृष्ट व्याख्यानांचा लाभ सुमारे 25 हजार सहयोगीनी घेतला. 00000

No comments:

Post a Comment