Tuesday 19 December 2023

दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 22 डिसेंबरला

 

नागपूर,दि. 19: बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी सोबतच  उद्योजकांना योग्य व कुशल मनुष्यबळ प्राप्तीसाठी दिनांक 22 डिसेंबरला सकाळी 1 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठातील दिक्षांत सभागृहात कौशलय विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पडींत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील इच्छुक बेरोजगार युवकांनी मेळाव्यात उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.

 मेळाव्यात नागपूर विभाग व विभागाबाहेरील मोठ्या कंपन्याचा सहभाग राहणार आहे. या कंपन्यांमध्ये आय. टी. आय., बँकींग, सेल्स एक्जेक्युट्युव, ग्रज्युऐट/अंडरग्रज्युऐट, बारहवीं पास/नापास यांच्यासाठी विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या रोजगार मेळावासाठी 1500 रिक्त पदांसाठी कंपन्यानी सहभाग नोंदविला आहे.  तसेच नागपूर विभागातील ईच्छुक युवक-युवतींनी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  संकेतस्थळास भेट देऊन मेळावासाठी नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, नागपूर कार्यालयाच्या 0712-2565479 या दुरध्वनी क्रमाकावर ज्योती वासुरकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उप आयुक्त प्र. वि. देशमाने यांनी केले.

0000

 

 


No comments:

Post a Comment