Tuesday 20 February 2024

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता


 

नागपूर दि.17 :  विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता ठरला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.  विदर्भातील विणकर आपले नाविण्यपूर्ण वाणाचे प्रकार विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी आणतात. त्या वाणांमधून समितीमार्फत 3 पारितोषिक दिले जातात व विणकरांना अनुक्रमे रक्कम 25 हजार, 20 हजार व 15 हजार असे पुरस्कार देण्यात येतात.

 

विजेत्यांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग आयुक्त अविद्यांत पंडा होते तर प्रमुख अतिथी म्हणून खनिकर्म संचालनालयाच्या वासुमना पंत (पंडा) होत्या. उपायुक्त श्री. पराते, प्राध्यापक लिपीका चक्रवर्ती,, गंगाधर गजभिये, अंजू बालपांडे यावेळी उपस्थित होते.

           

प्रारंभी दीप प्रज्वलन करुन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी हातमाग कापडाची पाहणी केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सिमा पांडे यांनी केले. राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून विणकरांना लाभ देत असते. त्या विविध योजनेबद्दल माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एच रोहणकर यांनी केले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

00000


--

No comments:

Post a Comment