Monday 12 February 2024

नागरिकांच्या तक्रारींना वेळेत उत्तर देवून सुस्पष्ट मार्गदर्शन करा -विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

 



 

§       विभागीय लोकशाही दिनात 4 तक्रारी प्राप्त

§       कमी तक्रारी ही लोकशाही दिन आयोजनाची सफलता

§       नागरिकांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरज पडू नये

 

   नागपूर दि. 12  :  विभागीय लोकशाही दिनात अपील अर्जांची संख्या कमी होवून तालुका व जिल्हास्तरावरील लोकशाही दिनातच नागरिकांच्या समस्या निकाली निघणे, ही लोकशाही दिन आयोजनाची सफलता आहे. मात्र शासकीय कार्यालयांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारींवर करण्यात येत असलेल्या कार्यवाहीसंदर्भात विहित वेळेत उत्तर देवून सुस्पष्ट मार्गदर्शन करावे, जेणेकरून त्यांना लोकशाही दिनात तक्रार करण्याची गरजच पडणार नाही, अशा सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

  प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या सोमवारी विभागस्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त कार्यालयात श्रीमती बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) विजय माहुरकर व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

  विभागीय लोकशाही दिनात आज एकूण चार तक्रार अर्ज दाखल करण्यात आले. विभागीय आयुक्त यांनी संबंधीत तक्रारदारांकडून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या व पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. प्राप्त सर्व तक्रार अर्ज पुढील 10 दिवसात निकाली काढण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी संबंधीत विभागांना दिले.

याप्रसंगी विविध विभाग प्रमुख व अधिकारी हजर होते.

0000

No comments:

Post a Comment