Friday, 17 January 2025

महिला लोकशाही दिन 20 जानेवारीला

        नागपूर दिनांक 17 : महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे त्यांना सुलभ मार्गदर्शन व्हावे यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून तक्रारदार महिलांनी आवश्यक त्या कागदपत्रासंह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

******


दहावीच्या परिक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ


           नागपूर दि. 17 :  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10वी)  फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला परीक्षेची आवेदनपत्रे शाळा प्रमुखांच्या माध्यमातून  ऑनलाईन प्रद्धतीने भरण्यास 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. असे विभागीय सचिव चिंतामण वंजारी, नागपूर विभागीय मंडळ, नागपूर यांनी कळविले आहे.

                                                                             ******

                                                        हरभऱ्यावरील घाटेअळीसाठी

एकात्मिक व्यवस्थापन आवश्यक

        नागपूर,दि 17 :  फुलोरा अवस्थेत असलेल्या हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून कीड व्यवस्थापन व उपाय योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. एकात्मिक व्यवस्थापनातून या किडीमुळे होणार नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करावे असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.

घाटे अळीचे परभक्षक पिकांमध्ये फिरुन घाटे अळया वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासाने शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा. ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर 20 पक्षी थांबे) तयार करुन शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम सोपे होते. कामगंध सापळयाचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळयांमध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

पीक फुलाऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे पीक परिस्थितीनुसार फवारणी करावी.

पहिली फवारणी (50 टक्के फुलोरावर असतांना)

निंबोळी अर्क 5 टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (1X 10 पिओबी/मिली) 500 एल.ई. हे किंवा क्विनॉलफॉस 25 ई.सी. 20 मिली याप्रमाणे करावी.

दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसानंतर) करण्यात यावी यासाठी

स्पिनेटोरम 11.70 टक्के एससी ९ मिली किंवा इमामेक्टीन बेझोएट 5 टक्के एस जी 4 ग्रॅम किंवा ईथिऑन 50 टक्के ईसी 25 मिली किंवा इंडोक्झाकार्ब 15.80 इसी 6.6 मिली किंवा लॅबडा सायहेलोथ्रीन 0.5 इसी 10 मिली याप्रमाणे करावी. कोणत्याही एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असे नागपूर विभागाचे, विभागीय कृषि सहसंचालक यांनी कळवले आहे.

******

No comments:

Post a Comment