नागपूर,दि. 23
: "ससा आणि कासव "या सर्व परिचित कथेचा आधार जरी असला तरी त्यातून मानवी
व सामाजिक जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्द्यावर या पुस्तकात प्रकाश टाकला असून
आजही या कथेची प्रासंगिकता पुस्तकाचे लेखकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. या पुस्तकातील
शर्यतीपूर्वी घडणाऱ्या घटना अतिशय समर्पकपणे मांडल्या असून कासवापेक्षा अत्यंत वेगवान
असलेला ससा ज्या कारणांमुळे हरतो तीच कारणे माणसाच्या देखील अधोगतीस कारणीभूत ठरतात
त्यामुळे मानवाच्या प्रगतीकरिता हे पुस्तक एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे मत विभागीय
आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी व्यक्त केले.
नागपूर मधील
क्रॉसवर्ड्स येथे राजेश ढाबरे कस्टम्स कमिशनर
चेन्नई लिखित मिस्टेक्स रॅबिट मेड या पुस्तकाचे विमोचन विभागीय महसूल आयुक्त विजयालक्ष्मी
बिदरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अविनाश थेटे, किशोर मानकर व जिल्हाधिकारी
डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थित होते.
बोधकथेची मांडणी अतिशय नाविन्यपूर्ण शैलीत केल्याबद्दल लेखकाचे विभागीय
आयुकत बिदरी यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सर्वांना हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात
अभिनव कलानिकेतन व आंबेडकरी नाट्य साहित्य क्षेत्रातील दादाकांत धनविजय, पुरण मेश्राम कुलसचिव नागपूर विद्यापीठ वनराईचे
गिरीश गांधी, सामाजिक चळवळीतील वामन सोमकुवर आदी मान्यवर उपस्थित होते.
पाहुण्यांचे
स्वागत डॉ. भावना ढाबरे, डॉ. माधवी ढाबरे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी
यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय चालखूरे यांनी केले.
00000
No comments:
Post a Comment