Wednesday, 12 March 2025

यशवंतराव चव्हाण यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 


 नागपूर, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, थोर राष्ट्रीय नेते, भारताचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली.



           आयुक्तालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, विकास उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांच्यासह  उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

०००००

No comments:

Post a Comment