नागपूर,
दि. १७ : प्रधानमंत्री आवास योजना (पीएमआवास शहरी) १.० व २.० बाबत विभागाची कामगिरी
उंचावणे व योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने विभागीय सह-आयुक्त संघमित्रा
ढोके यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. पीएमआवास १.० मधील मंजूर प्रकल्पांची
संपूर्ण अंमलबजावणी आणि पीएमआवास २.० अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या
सूचना यावेळी देण्यात आल्या.
दृकश्राव्य
माध्यमाद्वारे आयोजित या बैठकीस मनपा आयुक्त चंद्रपूर, नागपूर यांचे प्रतिनिधी कार्यकारी
अभियंता. (न.पा.प्र.) रामराज ठाकूर, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा सह आयुक्त व सर्व नागरी
स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी तसेच शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी)
उपस्थित होते.
विभागातील
महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास
योजना (शहरी) १.० व २.०, पीएम गतिशक्ती नॅशनल प्लॅन फॉरमल्टी-मॉडल कनेक्टीविटी या महत्वाकांक्षी
योजना, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, अमृत योजनेसह विविध योजनांचा आढावा
घेण्यात आला.
पीएमआवास
योजना (शहरी) १.० चे बीएलसी घटकांतर्गत एकूण २९८१५ घरकुले पूर्ण झालेली असून १५,६९९
घरकुले प्रगतीपथावर आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे बीएलसी घटकांतर्गत
एकूण १८,९२५ अर्ज प्राप्त झालेले पुढील मंजुरीचे कार्यवाहीकरिता प्रस्तावित करण्यात
आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पीएम आवास योजना (शहरी) १.० मधील मंजूर प्रकल्पांची
१०० टक्के अंमलबजावणी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना
लाभ मिळणेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याबाबत यावेळी सूचना देण्यात आल्या.
नागपूर
विभागातील संपूर्ण महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायती व नागपूर महानगर प्रदेश विकास
प्राधिकरण यांचे मुख्यधिकारी, शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ (सीएलटिसी) यांच्याकडून सविस्तर
आढावा घेण्यात आला. ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे उद्दिष्ट कमी आहे त्यांना
तातडीने उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने नियोजन करून उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत
श्रीमती ढोके यांनी मार्गदर्शन करून तात्काळ १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करण्याबाबत निर्देश
दिले.
प्रास्ताविक कार्यकारी अभियंता, (न.पा.प्र.) रामराज
ठाकूर यांनी केले तर देवाजी सडमेक, (न.पा.प्र.) नागपूर यांनी उपस्थितांचे आभार
मानले .
*******
No comments:
Post a Comment