नागपूर,
दि. 21 : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या
पार्श्वभूमीवर झुडपी जंगलाखालील जमीनीच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आज महसूल
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी
यांच्यासह नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार
पडली.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी
सादरीकरण करून झुडपी जंगला विषयी सविस्तर माहिती दिली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व माहिती
जाणून घेतल्यानंतर येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून झुडपी
जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल होण्यासाठी गतीने कार्यवाही करण्यासह महत्वाचे
निर्देश दिले.
अपर
प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन
इटनकर, विभागीय आयुक्तालयातील महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी
यावेळी उपस्थित होते. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी
दूरदृष्यप्रणालीद्वारे याबैठकीस उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment