नागपूर, दि.1 : कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा,
लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम
मराठी साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज विभागीय आयुक्त
कार्यालयात साजरी करण्यात आली.
आयुक्तालयातील
सभागृहात आयोजित कार्यक्रमात सामान्य प्रशासन अपर आयुक्त तेजूसिंह पवार यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विकास शाखेचे अपर आयुक्त कमलकिशोर फुटाणे,आस्थापना
शाखेचे अपर आयुक्त विवेक इलमे यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
0000
No comments:
Post a Comment