Monday, 18 August 2025

उच्च न्यायालयात ध्वजारोहण

 

 

नागपूर,दि. 15 : भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या दिनानिमित्त उच्च न्यायालयात  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमास दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर, न्या. अनिल पानसरे, न्या. उर्मिला जोशी-फलके, न्या. एम. डब्ल्यु चांदवाणी, न्या. वृषाली जोशी यासह उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती व प्रबंधक भूषण क्षीरसागर, उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष  ॲड. अतुल पांडे, अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी उपास्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

                                                

                                                            ******


No comments:

Post a Comment