Thursday, 14 July 2016

विविध पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

           नागपूर, दि. 13 : अनुसुचित जातीजमातीअपंगमनोदुर्बल व कुष्ठरोगी दलित आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शाहूफुलेआंबेडकर पारितोषिकपद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि संत रविदास पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन सहायक समाज कल्याण आयुक्तांनी केले असून 2016-17 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2016 आहे.
             समाजातील इतर संस्था वा समाजसेवकांना यापासून प्रेरणा मिळावी हा शासनाचा उद्देश असूननागपूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 50वर्षावरील पुरुष व 40 वर्षावरील महिला या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. इच्छुकांनी पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत छायाचित्रेकेलेल्या कार्याबद्दल वर्तमानपत्रातील कात्रणेप्रशस्ती पत्रकेपोलीस दाखला इत्यादी माहितीसह सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणनागपूर यांचे कार्यालयप्रशासकीय इमारतक्र. 1, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे दोन प्रतीत अर्ज सादर करावेतअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे.

No comments:

Post a Comment