मुंबई दि. १३ : माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. तथापि, या माध्यमाची गती पाहता त्याचा वापर काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे, असे मत विविध सोशल मीडिया व संवाद तज्ज्ञांनी आज येथे व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने तंत्र सोशल मीडियाचे या विषयावर मंत्रालयात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सायबर कायदे तज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी, सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग, तसेच प्रसिध्द छायाचित्रकार नितिन सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख, विषेश कार्य अधिकारी निधी कामदार, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल, किर्ती पांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक(प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (वृत्त जनसंपर्क) शिवाजी मानकर उपस्थित होते.
सोशल मीडियाचा वापर करताना साद-प्रतिसाद, परस्पर संवाद होणेही आवश्यक आहे. माहिती अधिकाऱ्यांनी विधायक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक या जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय यंत्रणेशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे, असे महासंचालक श्री. ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
यावेळी श्री. पाचलग यांनी शासकीय कार्यालयात फेसबुक, ट्विटर हँडल यु-ट्युब चॅनलचा वापर तसेच ब्लॉगची लेखन शैली कशी असावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. श्री पाचलग यांनी सोशल मीडियाच्या शासकीय कामातील प्रभावीपणे वापर करण्यासंदर्भात माहिती दिली.
ॲड. प्रशांत माळी यांनी सोशल मीडिया आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आणि चुका होऊ नये यासाठीची सतर्कता याबाबत विविध उदाहरणांसह माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीकिरण देशमुख म्हणाले, माध्यमात होणारे बदल स्वीकारणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करावा. विषेश कार्य अधिकारी निधी कामदार यांनीही कमी वेळेत माहिती लोकांपर्यंत जाण्यासाठी सोशल मीडिया गरजेचा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी हेमराज बागूल म्हणाले, स्मार्ट फोनचा गुणात्मक वापर करणे आवश्यक आहे. किर्ती पांडे म्हणाल्या, सोशल मीडियाचा शासकीय प्रसिध्दीसाठी योग्य वापर करणे आवश्यक आहे.
दै.इकॉनॉमिक्स टाईम्सचे फोटोग्राफर नितीन सोनवणे यांनी फोटोग्राफीचे महत्व सांगून त्याविषयीची तांत्रिक माहिती दिली.
यावेळी संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचे महत्व आणि उद्देश विशद केला.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक, माहिती अधिकारी , सहायक संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संशोधन अधिकारी मयुरा देशपांडे, सहायक संचालक(माहिती) बी.के.झंवर यांनी केले.

No comments:
Post a Comment