भंडारा, दि. 16 :- शासनाने
राबविलेल्या ‘ दोन कोटी वृक्षलागवडी ’
च्या महत्त्वाकांक्षी
मोहीमेच्या यशस्वीतेचा साक्षीदार असलेला जुलै 2016 चा
मराठी ‘लोकराज्य’चा अंक वाचकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जल, जमीन आणि जंगलाचे संवर्धन यासंबंधीचा लेख, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेती व त्यातील
बदलावर मुख्यमंत्र्यांनी केलेले चिंतन, वनमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांची विशेष मुलाखत आणि वाघांचे जगभरातील विविध प्रकार हे या
अंकाचे आकर्षण आहे. विविधांगी
माहितीने परीपूर्ण असलेला हा अंक स्टॉलवर उपलब्ध झाला आहे.
जलयुक्त शिवार मोहीमेंतर्गत झालेली शेततळी, नदी खोलीकरण आदी कामांचे दृश्य
परिणाम आता काही दिवसांच्या पावसानंतर दिसू लागले आहेत. जलयुक्त
शिवार योजनेच्या यशस्वीतेसंबंधी आढावा अंकात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संघ लोकसेवा आयोगाच्या
नागरी सेवा परीक्षेत प्रथम
क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या टीना डाबी आणि नाशिक येथील पोलीस
उपनिरीक्षक प्रशिक्षणात ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’नेसन्मानित झालेल्या मीना तुपे यांची मुलाखत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी
प्रेरणादायी आहे.
त्याचबरोबर प्रधानमंत्री फसल बिमा योजना, यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
जगण्याची उभारी देणारे चेतना अभियान, पंढरपूरचा
कायापालटाची मुहूर्तमेढ रोवणारा नमामी चंद्रभागा निर्णय, योग दिन, आरोग्य, भ्रमंती याविषयीचे लेख वाचनीय आहेत.
00000

No comments:
Post a Comment