Saturday, 13 August 2016

शहरात आजपासून झोननिहाय मुख्यमंत्री समाधान शिबिर - पालकमंत्री

नागपूर, दि. 8 : समाधान शिबिराच्या माध्यमातून यापूर्वी अनेक गरजू लोकांचे प्रश्न सुटलेले असून आता समाधान शिबिराचे महानगर पालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये आयोजन करण्यात येणार असून या समधान शिबिरास मुख्यमंत्री समाधान शिबिर आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज   बैठकीत दिली.
हैद्राबाद हाऊस येथे पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे आयोजित बैठकीत  बोलत होते. याप्रसंगी महापौर प्रविण दटके, आमदार विकास कुंभारे, जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी श्रीमती आशा पठाण व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मधल्या काळात काही कारणास्तव समाधान शिबिरे होवू शकली नाहीत. परंतु आता महानगरपालिकेच्या 10 झोनमध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून पहिले समाधान शिबिर लक्ष्मीनगर झोन येथे  9 ते 12 ऑगस्ट या तीन दिवसात आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात जिल्हा प्रशासन, मनपा, भूमी अभिलेख, पुरवठा विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, विद्युत विभाग, आरोग्य विभाग व विविध विभागाचे  सर्व प्रमुख अधिकारी सहभागी होतील. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, यापूर्वी झालेल्या समाधान शिबिरांना इलेक्ट्रॉनिक्स व प्रिंट मीडियाने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी  दिल्यामुळे ते समाधान शिबिरे यशस्वी होवू शकली. आताही प्रसार माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी. अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने विविध बँकांच्या सहाय्याने 759 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला  आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे  यांनी मोठया प्रमाणात प्रयत्न करुन बँकांना विश्वासात घेवून पीक कर्ज मंजूर केल्यामुळे यामुळे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे हार्दिक अभिनंदन करतो. असेही ते यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, उर्वरित 36 हजार 679 शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी 50 टक्के व्याज सवलत देण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्यांनाही पीक कर्ज मंजूर करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी यावेळ सांगितले.
*****

No comments:

Post a Comment