एलएडी मोबाईल वॉलवर योजनांची जनजागृती
नागपूर दि. 13 : कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दृकश्राव्य हे प्रभावी माध्यम आहे. एलएडी मोबाईल व्हॅन द्वारे विविध योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहचत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे एलएडी मोबाईल वॉलचा वापर करुन योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमाचा शुभारंभ सचिन कुर्वे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, जिल्हा नियोजन अधिकारी के.व्ही. फिरके, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या दोन वर्षे पूर्तीनिमित्त जलयुक्त शिवारसह राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती एलएडी मोबाईल व्हॅनद्वारे जनतेपर्यंत पोहचविण्यात येत असून नागपूरसह जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवार दिनांक 20 डिसेंबर पर्यंत योजनांच्या जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
प्रारंभी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच एलएडी व्हॅनद्वारे योजनांच्या प्रसिद्धी संदर्भातील उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी हिरवी झेंडी दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. एलएडी व्हॅनचा प्रभावी वापर करुन ग्रामीण जनतेपर्यंत विविध योजनांची माहिती सुलभपणे पोहचविणे शक्य होत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम सुरु करावा, अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केली. जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
*****


No comments:
Post a Comment