नागपूर, दि. 13 : राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबईहून विमानाने आगमन झाले. विमानतळावर महापौर प्रवीण दटके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राज्यपालांच्या समवेत श्रीमती चे. विनोधा यांचेही आगमन झाले.
राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आगमन झाल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस उपायुक्त श्रीमती दिपाली मासिरकर यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विमानतळावरील स्वागताचा स्वीकार करुन राज्यपालांचे राजभवनकडे प्रयाण झाले.

No comments:
Post a Comment