Tuesday, 13 December 2016

अधिवेशन दूरध्वनी पुस्तिका ॲन्ड्रॉइड ‘मोबाईल ॲप’वर

नागपूर,दि.12 -:  विधीमंडळ अधिवेशनासाठी माहिती व जनसंपर्क विभागातर्फे तयार करण्यात आलेली दूरध्वनीपुस्तिका  ‘मोबाईल ॲप’वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  दूरध्वनीपुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी www.appsgeyser.com/3709778 या url या लिंकवर उपलब्ध आहे.
माहिती व जनसंपर्क विभागातर्फे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी दूरध्वनीपुस्तिका प्रकाशित करण्यात येते. या पुस्तिकेमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विधान परिषदेचे सभापती, उपसभापती व विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते तसेच मुख्यमंत्री व मंत्री मंडळातील सदस्य तसेच विधीमंडळासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी यांचे कार्यालयीन व निवासी दूरध्वनी क्रमांक या पुस्तिकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येतात.
दूरध्वनी पुस्तिकेमध्ये अधिवेशनानिमित्त नागपूरला येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यासह नागपूरसह विदर्भातील विविध शासकीय कार्यालय व कार्यालय प्रमुखांचे कार्यालय व निवासी दूरध्वनी क्रमांकही या दूरध्वनी पुस्तिकेच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध करुन देण्यात येतात. प्रथमच माहिती व जनसंपर्क विभागातर्फे ही दूरध्वनी पुस्तिका ‘मोबाईल ॲप’ वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

*******

No comments:

Post a Comment