मुंबई, दि. 28 : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा व टॅक्सीमधे जीपीएस प्रणाली लावण्यात येईल, असे गृहराज्य मंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
ठाणे परिसरात 36 हजार परवानाधारक ऑटोरिक्षा आहेत. तसेच 30 हजार ऑटोरिक्षा धारकांकडे स्मार्ट कार्ड आहेत. मागेल त्याला परवाना हे धोरण शासन राबवित आहे. मात्र यासंदर्भात अधिक माहिती घेतली जाईल. नौपाडा पोलीस स्टेशनमधील घटनेनंतर पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली असून 7212 ऑटोरिक्षा तपासण्यात आल्या आहेत. 104 ऑटोरिक्षांचा परवाना निलंबित केला असून 108 रिक्षाचालकांची अनुज्ञप्ती निलंबित केली आहे. 2016-17 मधून ठाण्यामधून 17हजार वाहने दोषी आढळली तर 353 जणांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. 555 लोकांकडे परवाने नसल्याचे आढळले. 3 कोटी 47 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री किसन कथोरे, संग्राम थोपटे,संजय केळकर यांनी सहभाग घेतला.
000
No comments:
Post a Comment