मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘एस. टी. महामंडळाची यशस्वी वाटचाल’ या विषयावर परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत शुक्रवार,दि. २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटेयांनी ही मुलाखत घेतली आहे.
गणेशोत्सवाकरिता एसटी महामंडळाने केलेली तयारी, राज्यात एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट निर्मितीचा कार्यक्रम, एसटी कर्मचाऱ्यांचे गणवेश बदलण्याचा निर्णय, नव्याने सुरू केलेल्या शिवशाही बसचे वेगळेपण काय आहे? एसटीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी महामंडळाने घेतलेले कार्यक्रम या विषयी सविस्तर माहिती श्री.रावते यांनी ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात माहिती दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment