मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’कार्यक्रमात ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव’ या विषयावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक डॉ. यशवंत सोनटक्के यांची मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. ही मुलाखत २५ आणि २६ ऑगस्ट रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा कसा करावा, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे सण आणि उत्सव या कालावधीत राबविण्यात येणारे जनजागृतीपर उपक्रम, गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वी आणि केल्यानंतर पर्यावरणाची हानी होऊ नये याची खबरदारी कशी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती डॉ. सोनटक्के यांनी ‘दिलखुलास’कार्यक्रमात दिली आहे.
००००
No comments:
Post a Comment