मुंबई, दि. 24 : नागपूरच्या 40767 ए व्हाईस एडमिरल किशोर ओमकार ठाकरे यांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत सैन्यातील 14 प्रकारच्या शौर्यपदक/सेवापदक धारकांना शासकीय अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येते. 40767 ए व्हाईस एडमिरल किशोर ओमकार ठाकरे यांना राष्ट्रपती सचिवालयामार्फत अती विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. ए व्हाईस एडमिरल किशोर ओमकार ठाकरे यांना यापूर्वी नौसेना पदक प्राप्त झाले असून, आता प्राप्त अती विशिष्ट सेवा पदकाची एकूण रक्कम 85 हजार रुपये आणि नौसेना पदकाची यापूर्वी देण्यात आलेली रक्कम 23 हजार रुपये वजा करुन 62 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम नागपूरच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थहावर उपलब्ध करणत आला असून त्याचा संकेताक 201707561132153807 असा आहे.
००००
No comments:
Post a Comment